देवदत्त मोरे फाऊंडेशन च्या वतीने शिलाई मशिन चे वाटप:




 तडवळे रिपोर्टर: मोरे फाऊंडेशन च्या वतीने तालुक्यातील येडशी येथील जय हनुमान मित्रमंडळाच्या नवरात्र महोत्सवात सौ अर्चनाताई मोरे यांच्या हास्ते पाच शिलाई मशिन आणि एक सायकलचे वाटप करण्यात आले. 
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जय हणुमान मित्रमंडळ व देवदत्त मोरे फाऊंडेशन यांच्या वतीने पाच गरजू विधवा  महिलांना शिलाई मशिन व एक अपंग व्यक्तीला सायकलचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम येडशी येथील जनता विद्यालय समोर पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मनसेच्या महिला सेनेच्या उस्मानाबाद जिल्हाअध्यक्षा वैशालीताई गायकवाड होत्या तर प्रमुख पाहुण्या अर्चनाताई देवदत्त मोरे ,मुलगा आदेश मोरे ,देविका मोरे या उपस्थिती  प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जय हनुमान मित्र मंडळाचे राजेंद्र पवार ,भालशंकर,तडवळ्याचे पत्रकार विकास उबाळे , भागवत शिंदे ,विजय पवार ,बन्नी थोडसरे हे उपस्थीत होते, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज पवार,सचीन शिंदे ,राजु ईटकर 'गोविंदा ईटकर ,राकेश पवार ,सुनील पवार ,हणुमंत ईटकर, पिंटू भांडेकर, निलेश शिंदे , विठ्ठल पवार , सचिन मंजुळे, पंकज पवार, राजेंद्र पवार ,बापू ईटकर ,संजय पवार , बालाजी पवार , दत्ता पवार आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते