महाराजस्व अभियानास उस्फुर्त प्रतिसाद






रिपोर्टर:  दि २७ ऑक्टोबर २०१८ रोजी उमरगा येथील कु माधवी कन्या प्रशाला येथे महाराष्ट्र शासन आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उमरगा उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले , तहसीलदार संजय पवार, यांच्या सह आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर  पाटील आणि युवा नेते हर्षवर्धन चालुक्य,माधव पवार, जि प सदस्य ज्ञानदेव राजगुरु, सिद्धेश्वर माने, अभिराम पाटील, शहाजी पाटील, हंसराज गायकवाड आदींची उपस्थिती होती.
 भारत सरकारच्या नीती मूल्य आयोगाच्या अहवालानुसार देशात अतिमागास म्हणून उस्मानाबाद जिल्हा हा तिस—या क्रमांकावर आहे. म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे दरडोई आर्थिक उत्पन्न वाढावे आणि त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहचव्यात म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजना घराघरात पोहचव्यात या साठी महाराष्ट्र शासन आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद यांच्या
वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये साधारण शासनाच्या २३ विभागातील कर्मचार्यानी स्टॉल मांडून  जवळपास १५०० गरजूंनी आपली नाव नोंदणी करून लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केले. यावेळी तात्काळ प्रमाणपत्राच वाटपही करण्यात आले  या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कन्या प्रशालेचे शिक्षक निंबाळकर , स्वप्नील पाटील, कुमार निकम, संदीप जगताप, अमर वरवटे, आदींनी परिश्रम घेतले !