रॉबिनहूड आर्मी आणि सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर:





 रिपोर्टर...रोजी"रॉबिनहूड आर्मी उस्मानाबाद" मार्फत "मधूबन कुष्ठधाम उस्मानाबाद" येथे सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले...याप्रसंगी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, उस्मानाबाद चे श्री डॉ. दिग्गज दापके-देशमुख सर,डॉ.सतीश गवाड सर आणि दादासाहेब कोरके सरांच्या सहकार्याने आणि पोलीस उपनिरीक्षक श्री सोहन धोत्रे सरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
तसेच आरोग्य तपासणी शिबीरा नंतर मधूनबन कुष्ठधाम मधील राहत असलेल्या सर्व सदस्यांच्या मागणी नुसार श्री कपिल नवगिरे (बारूळ.ता.तुळजापूर) यांच्या मार्फत बिर्याणीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रॉबिनहूड आर्मीचे अक्षय माने,सुरज मस्के,अ‍ॅड विशाल साखरे,अमृता माने,नवज्योत शिंगाडे,प्रा.सोहन कांबळे,धम्मपाल बनसोडे,भाग्यश्री सुगावे, धनश्री सुगावे,आकाश घंटे,विकी राऊत,राहुल गायकवाड हे उपस्थित होते.