विकास उबाळे
तडवळे उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील रहिवासी व सद्या जिल्हा परिषद प्रशाला, इटकूर ता. कळंब येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक अनिल क्षिरसागर यांना रोटरी क्लब व एकता फाऊंडेशन, उस्मानाबाद यांच्या संयक्त विद्यमाने शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले .
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष गजानन धरणे, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर, ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सचिव रणजित रणदिवे इ. उपस्थित होते.
क्षीरसागर सर यांनी आदर्श कन्या शाळा क तडवळे येथे कार्यरत असताना नवोदय व स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेत विध्यार्थी यांना चांगले मार्गदर्शन केले होते आदर्श शिक्षक श्री धायगुडे सर यांच्या बरोबर त्यांनी काम करून बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते ,तडवळे येथील शाळेत चांगल्या शिक्षकांनच्या यादीत त्यांचे नावं घेतले जात होते
अनिल क्षिरसागर यांची उपक्रमशिल व गुणवंत शिक्षक म्हणून जिल्ह्यात ओळख असून या आदी देखील क्षिरसागर यांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या या पुरस्कारा बद्दल ग्रामस्थाकडुन , गावातील शिक्षणप्रेमी नागरीका कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.