अर्चनाताई पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापुरी बंधारे दुरूस्तीसाठी जिल्हापरिषदेला 30 कोटी रूपये मंजुर:उस्मानाबद रिपोर्टर:   निती आयोगाने निवडलेल्या जिल्हयामध्ये उस्मानाबादचा समावेश आसल्यामुळे आणि कमी होत चाललेली सिंचनाची स्थिती पाहुन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी जिल्हापरिषदेच्या अंतर्गत येणा—या कोल्हापुरी बंधा—याच्या दुरूस्तीसाठी जलसंधारण विभागाकडुन 30 कोटी रूपयेचा निधी मंजुर करून घेतला आहे. हे दुरूस्तीचे काम लवकरच सरू होणार आसल्याची माहीती आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये अर्चनाताई पाटील यांनी दिली.या वेळी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांची उपस्थिती होती.

उस्मानाबाद जिल्हयाच्या भौगोलीक परिस्थितीचा विचार करूण माजी गृहमंत्री डॉ.पदमसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन त्यावेळी 1022 कोल्हापुरी बंधारे,513 पाझर तलााव व 126 साठवण तलाव बांधण्यात आले होते.
जवळ जवळ 250 कोटी पेक्षा जास्त रूपये किमतीचे हे सर्व बंधारे थोडया फार नादुरूस्तीमुळे वापरात नाहीत. याचा सर्वे जिल्हापरिषदेच्या माध्यमातुन करण्यात आला आणि या बंधा—याच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करूण देण्याची मागणी आमदार रानाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषदेच्या माध्यमातुन जलसंधारण मंत्री,ग्रामविकास मंत्री,यांच्याकडे करण्यात आली होती.या मागणीचा जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील आणि उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सातत्यांने पाठपुरावा केल्याने हा निधी लवकरच मंजुर करण्यात आला.मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र जलदविकासासाठी राबवण्याच्या उपाय योजनेचा विशेष कार्यक्रम 2018 अंतर्गत सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे 983 कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातुन 30 कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. या सर्व बंधा—यांची दुरूस्ती झाल्यावर जिल्हयाच्या सिंचनामध्ये बराच फरक पडणार आसल्याची माहीती यावेळी देण्यात आली.