उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करणा—या तेरणा धरणामध्ये फक्त 18 टक्के पाणी साठा शिल्लक:



रिपोर्टर: पावसाळा संपल्याचे संकेत स्पष्ट दिसत असून उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या तेरणा प्रकल्फ  शाखेतंर्गत येणाऱ्या  आठ तलावा पैकी 6 तलाव कोरडे पडले आहेत तर उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात 18 टक्के पाणी उपलब्ध असतानाच जागजी साठवण तलावातील पाणी  मृत साठ्या पर्यत खाली गेले आहे त्यामुळे या भागातील जनतेला भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे

उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात आज रोजी आवघा  16. टक्के पाणी साठा उपलब्ध असून कोंड. साठवण तलावाने तळ गाठला आहे या तलावात 9.96 टक्के पाणी आहे तर जागजी. साठवण तलावात मृत साठा आहे

तेरणा प्रकल्प शाखेतंर्गत येणारे घुगी लघू.प्रकल्प संत गोरोबाकाका   तेर  रामवाडी  को.प.बंधारा येवती व टाकळी  लघू प्रकल्प   व पाडोळी साठवण 6. तलाव हे भर पावसाळ्यात ही कोरडे पडले आहेत त्यामुळे तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

उस्मानाबाद नगरपरिषद तेरणा धरणातून 18 तास पंप चालू ठेवून रोज  24 लाख लीटर पाणी उपसा करीत आहे