सामाजीक कामे करण्यासाठी जवळचे 10 कोटी खर्च करणारे देवदत्त मोरे हे जिल्हयातील पहीलीच व्यक्ती:

2019 मध्ये लोकसभेसाठी जनतेच्या मनातील उमेदवार


श्रीराम क्षीरसागर:

उस्मानाबाद जिल्हयामध्ये आनेक पैशावाले आहेत परंतु सामाजीक बांधीलकी आणि जवळच्या पैशानी जनतेच्या आडचनी सोडवणारे शोधुनही सापडणार नाहीत.परंतु या संगळया गोष्टीला फाटा देत उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथिल उदयोजक देवदत्त मोरे यांनी गावांसाठी आणि परिसरातील खेडयापाडयासाठी विविध विकास कामे करूण आपल्या मातीचे देणे फेडण्याचे काम केले आहे.तडवळा हे  देवदत्त मोरे यांचे जन्मगाव आसल्याने गावपरिसरातील लोकांच्या मुलभुत आडचनी समजुन घेवुन मोरे यांनी गावातील जिल्हापरिषद शाळेतील विदयार्थ्यांपासुन ते आगदी शेतक—यां पर्यत संगळया स्तरातील लोकांच्या आडचनी सोडवण्याचे काम केले आहे.शेतीविषय,शैक्षणीक,आरोग्य या महत्वाच्या विषयावरती स्वत:चा पैसा खर्च करूण लोकांच्या समस्या सोडवल्यामुळे देवदत्त मोरे यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.एवडेच नाही तर 2019 मध्ये लोकसभेसाठी जनतेच्या मनातील उमेदवार म्हणुन देवदत्त मोरे यांच्याकडे पाहीले जात आहे.

मोरे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेयचा म्हटल तर:

साडेचार कोटी रुपये खर्च येणा—या दवाखाच्या बिल्डींगच काम प्रगतीपथावर आसुन साठ लाखांचे जलसंधारण नदी खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण 10 किलोमीटर,दलित वस्तीसाठी तीस लाखाचा सभामंडप,अशा दोन तीन  नव्हे तर अनेक विकासकामांवर वर्षभरात साडेआठ कोटी रूपये मोरे यांच्याकडुन खर्च करण्यात आले आहेत कुठलीही शसकीय किंवा लोकवाटयाची मदत न घेता ही संगळी कामे जवळच्या पैशानी देवदत्त मोरे यांनी केली आहेत. खर तर आशा प्रकारची विकास कामे ही आमदार आणि खासदार निधीतुन होणे आपेक्षीत आहे कारण वर्षाकाटी आमदारांना दोन कोटी तर खासदारांना पाच कोटी रुपये एवढा निधी मिळतो मात्र देवदत्त मोरे या तरुण उद्योजकाने आपल्या जन्मभुमीसाठी आमदार आणि खासदारांपेक्षा मोलाचे काम केल्याचे दिसत आहे.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या खिशातून पैसे घालुन सुरू केलेली सर्व कामे पुर्णत्वाकडे आहेत.काही वर्षापुर्वी नोकरीच्या शोधात गावं सोडून पुणे येथे गेलेले देवदत्त मोरे यांनी चिकाटी व बुद्धीच्या जोरावर व्यवयाय चालू करून मोठा उद्योग वाढवला आणि लवकरच कीर्ती मिळवली.उद्योग क्षेत्रात मोठे  नाव कमवुन देश विदेशात मोठय़ा प्रमाणात व्यावसायाचे जाळे पसरावुन त्यांनी त्यांचा विकास मोर्चा आपल्या जन्मगावी ओळवला.मागीलवर्षांपासून स्वतःच्या मायभूमीत आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्दात्य हेतूने मोरे यांनी रचनात्मक काम करण्यास प्रारंभ केला दोन तीन वर्षातील त्यांनी केलेल्या विकासकामाची यादी पाहिली असता पूर्ण झालेली आणि सध्या प्रगती पथावर आसणा—या कामाची रक्कम कमीत कमी साडेआठ कोटी रुपयांच्या आसपास आहे ,
तडवळे हे गाव लातूर पुणे महामार्गावर असून येथे मोठा दवाखाना नसल्याने या परिसरातील लोकांची मोठी आडचन होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना उस्मानाबाद किंवा बार्शी या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. त्याच बरोबर गावातून गेलेला राज्य मार्ग अरुंद असल्याने तडवळे परिसरात नेहमीच आपघात होताना दिसतात.यावेळी जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद ,लातुर किंवा बार्शी येथे घेऊन जावे लागते ही गैर सोय दूर होण्या करिता मोरे यांनी कसबे तडवळे येथे मोठया दवाखाण्याचे बांधकाम सुरू केले आहे. याच बरोबर धार्मीक कामामध्ये सुध्दा मोरे यांचा मोलाचा वाटा आसतो.तडवळा येथिल राम मंदीराचे काम आसो किंवा हजरत भैरउल्ला शहा दर्ग्याच्या सुशोभीकरणासह खंडोबा मंदीर,महादेव मंदीर दुधगाव येथील श्रीकृष्ण मंदीर,या सह येडशी येथिल प्रसिध्द तिर्थक्षेत्र रामलिंग मंदीराचे काम या सर्व कामाच्या खर्चाचे आकडे लाखो रूपयाच्या घरात आहेत. त्याच बरोबर शेतक—यांसाठी जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे नदी खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण ही कामे हाती घेवून आमलात आनली आज त्या कामामुळे विहीर बोरवेल यांना पाणी वाढून याचा शेकडो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.या नदी रूंदीकरण्याच्या कामामुळे.या परिसरातील सुमारे 400 हेक्टरवर शेतीला याचा फायदा झाला आहे.शैक्षणीक बाबतीत सुध्दा तडवळा येथिल जिल्हा परिषद शाळामध्ये टॉब वाटपासह विदयार्थ्यांना अर्थिक मदत करणे गावामधील कोणी आजारा ने पिडीत असेल त्याला मदत करणे,तडवळयापासुन आसपासच्या खेडयाला जोडणारे रस्ते, शेतक—यांना बोअर पाडुन देणे.त्याच बरोबर गावातील व आसपासच्या गावातील गणेश उत्सव किंवा सामाजीक आणि धार्मीक कार्यक्रमाला माठया हाताने देणगी देणे आशा  प्रकारची लोकउपयोगी काम देवदत्त मोरे यांच्या माध्यमातुन सातत्यान चालु आसल्याची दिसतात. या सर्व कामाच्या माध्यमातुन मोरे यांनी गोरगरिब जनता आणि शेतक—यापासुन ते लहान विदयार्थ्यांपर्यत सर्वांच्याच मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही सर्व परिस्थिती पहाता तडवळा गावासह जिल्हयामध्ये 2019 चा जनतेच्या मनातील लोकसभेचा उमेदवार म्हणुन देवदत्त मोरे यांच्या कडे पाहीले जात आहे.