जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुलांनी साकारले इकोफ्रेण्ड्लि गणपती.
रिपोर्टर
क तडवळे प्रतिनिधी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत  मुलांनी साकारले इकोफ्रेण्ड्लि गणपती.
   
      इकोफ्रेण्ड्लि गणपती साध्या मातीपासून किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्यापासून न बनविता शाडुचि मूर्ती  बनविण्यात आलि,शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हे मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले.  मंगलमूर्ती तयार झाल्यानंतर वर्गातील माताभगीणीना बोलवून कार्यक्रम घेण्यात आला,
    प्रथमतः उद्घाटनाचा कार्यक्रम सारिकाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला,नंतर आलेल्या सर्व भगिनिन्चे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .  सहशिक्षिका श्रीम भावना चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक  सादर केले, महिला भगीनी नी  मनोगत व  मोलाचे मार्गदर्शक तसेच  भावना चौधरी यांचे कौतुक व  अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मु अ  श्रीमति सुरेखा टोणे यानी या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शकाचा सत्कार केला व आलेल्या माताभगिनिन्चे आभार मानले,
      माताभगिनींना  इकोफ्रेण्ड्लि मंगलमूर्ती देण्यात आली.सर्व महिला भगिनींना इकोफ्रेण्ड्लि गणपतीचे महती समजल्याने आम्ही हाच गणपती घरी बसवू अशी पर्यावरणपूरक साथ दिली ...विशेष म्हणजे शाळेतही हाच गणपती आम्ही बसवू मु अ  टोणे यानी ही सर्वाना ग्वाही दिली.