उस्मानाबाद, दि. 21:- केंद्र शासनाद्वारे “स्वच्छता ही सेवा” अभियान दि.15 सप्टेंबर 2018 ते 02 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत राबवून राज्यात व जिल्हयात स्वचछतेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी देशभर महाश्रमदान दिवस निश्चित केलेला आहे.
या दिवशी सकाळी 10 वाजता कळंब तालुक्यातील येरमाळा ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हास्तरीय महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी येरमाळा क्षेत्रात महाश्रमदान करणेसाठी येरमाळा स्थानिक गावातील व तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, उमेद अंतर्गत कार्यरत सर्व महिला बचत गटांचे महिला, स्वच्छागृही, नागरिक व ग्रामस्थ यांनी सहभाग घ्यावा.
याच दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाश्रमदानसाठी प्रत्येक तालुक्यातील एक प्रसिध्द ठिकाण किंवा एका गावाची निवड करुन तालुक्यातील अनेक स्वच्छाग्रहींना दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी एकत्रीत यावे व श्रमदान करण्यासाठी या उपक्रमांमध्ये स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व ग्रामस्थांचा सहभाग घेवून महाश्रमदान करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.