ईटकूर येथील कुलस्वामिनी गणेश मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम संपन्न


कळंब रिपोर्टर. - तालुक्यातील ईटकूर येथे तरुणांनी सामाजिक कार्याच्या ध्येयाने एकत्रीत येवून कुलस्वामिनी गणेश मंडळाची स्थापना करून मागिल अनेक वर्षापासून खर्चिक बाबीला फाटा देवून, मिरवणूकीत गुलाला ऐवजी फुले , शालेय विद्यार्थांसाठी विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर आदि विविध सामाजिक उपक्रम या मंडळाकडुन राबविले जातात
याबाबत सविस्तर वृत्त असे की या वर्षी मंडळाचे अध्यक्ष अक्षय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य यांनी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या वयोगटात सामान्य ज्ञान, निबंध, रांगोळी, संगित खुर्ची आदि स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांना जि .प. प्रशालेत कळंब पोस्टेचे सपोनि ठाकूर, शिक्षक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे , प्रा. उद्धव गंभीरे, जिवन गंभीरे, लखन बेमटे प्रशालेचे मुख्याध्यापक एस.आर. वाघमारे  यांच्या हस्ते प्रोहत्सान म्हणून रोख रक्कम , शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
सामाजिक बांधिलकी म्हणून वयोवृध्दासाठी मोफत रक्त तपासणी व कर्णबधीर तपासणी करण्यात आली या तपासणी शिबीराचे उदघाटन पत्रकार लक्ष्मण शिंदे , तलाठी शिरसेवाड यांच्या हस्ते संपन्न झाले , यावेळी माजी राज्यआदर्श शिक्षक तुकाराम शिंदे, भाई बाबुराव जाधव , पोपा. सोमनाथ जगताप अध्यक्ष अक्षय वाघमारे मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती रुग्ण तपासणीसाठी चांडक हॉस्पिटल चे प्रशासकीय अधिकारी निलेषप्रधान ऑडिओलॉजिस्ट डॉ. समाधान ओव्हाळ, राजेश शिरगिरे यांनी रुग्ण तपासणी केली . शिबीरात दिडशे रुग्णांनी रक्त तपासणी व कान तपासणी करून घेतली , कान तपासणी करून घेतलेल्या रुग्णांना चांडक हॉस्पीटल मुरुड यांच्याकडुन कानाचे मोफत मिशन देण्यात येणार आहे तर रक्त तपासणी रिपोर्ट ही मंडळाकडुन रुग्णांना घरपोच मिळणार आहे.
कुलस्वामिनी गणेश मंडळाने राबविलेल्या सुत्य उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे