शिक्षक दिनानिमीत्त तडवळा येथे गुरूजनांचा सत्कार...



रिपोर्टर..उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथे शिक्षक दिना निमित्त माजी जिल्हापरिषद सदस्य कोंडाप्पा कोरे यांच्या वतीने 250 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


 डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो .या शिक्षक दिनानिमित्ताने जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे महाराष्ट्र राज्य शेतकरी शेतमजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व  माजी जि. प. सदस्य  कोंडापा कोरे यांच्या वतीने कळंब व उस्मानाबाद तालुक्यातील जवळपास २५० शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .
  कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. .यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील ,शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,शिक्षण विस्तार अधिकारी किशोरी जोशी ,कोंडाप्पा कोरे, शिवाजी कोरे ,लक्ष्मण लांडगे 'रवी कोरे ,राजेंद्र लकडे, मुख्याध्यापक जाधव,शिवाजी कोरे उपस्थितीत होते .
 यावेळी सुधीर पाटील 'किशोरी जोशी 'बाळकृष्ण तांबारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.