
लोहारा तालुक्यातील बेडकाळ व नागराळ ग्रामपंचायत पंचवार्षीक निवडणुकीत बेडकाळ तीन तर नागराळ पाच असे एकुण आठ सदस्य बिनविरोध निघाले आहेत.
बेडकाळ व नागराळ या दोन ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण महीलेसाठी राखीव आहे. बेंडकाळ सरपंचपदासाठी सुरेखा अनंत गोरे, अनुसया सुनिल गोरे,शितल गुणवंत गोरे,शकुतला शिवाजी गोरे यांनी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमाक एक मध्ये सर्वसाधारण एका जागेसाठी गुणवंत गोरे व लक्ष्मण गोरे सर्वसाधारणमध्ये रत्नप्रभा गोरे व सोनाली गोरे यांच्यात लढत. प्रभाग क्रमाक दोनमध्ये सर्वसाधारणमधुन अनिल पवार बिनविरोध, याच प्रभागात नामाप्र महीलासाठी राखीव होते. पण या जागेवर एक ही अर्ज न आल्याने ही रीक्त, सर्वसाधारण महीला मध्ये शांता गोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध, प्रभाग क्रमाक तीनमध्ये नामाप्रच्या जागेवर शिवानंद कुंभार यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निघाले. याच प्रभागात अनुसुचित जाती महीलाच्या एका जागेसाठी तारामती माने,संजना कांबळे,चित्राबाई कांबळे यांच्यात लढत आहे. तर नागराळ सरपंचपदासाठी जयश्री तुकाराम पाटील, इंद्रायणी गोरे, रीतु कुलदिप गोरे, सिना किरण चिचोंले, निर्मलाबाई नेताजी गोरे यांनी अर्ज दाखल केला. यातील सिना चिचोंले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे सरपंचपदाच्या एका जागेसाठी चार जणांत लढत आहे. प्रभाग क्रमाक एक मधुन सर्वसाधारण महीलाच्या दोन जागेसाठी रुपाली माटे, अंजनाबाई गोरे हे दोनच अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध निघाल्या आहे. प्रभाग क्रमाक दोनमधुन अनुसुचित जामाती वर्गाच्या एका जागेसाठी गुंडा जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने हे बिनविरोध निघाले. अनुसुचित जामाती वर्गाच्या महीला राखीव एका जागेसाठी रुपाली तानाजी माटे यांचा एकमेव अर्ज आल्याने हे बिनविरोध निघाले. याच प्रभागात सर्वसाधारणच्या एका जागेसाठी उमाकांत गोरे,चेतन गोरे, नेताजी गोरे, निळकंठ गोरे, रविकांत भोंडवे या पाच जणांचे अर्ज आले होते. यातील नेताजी गोरे यांनी माघार घेतली. यामुळे आता या एका जागेसाठी चार उमेदवार रींगणात आहेत.
प्रभाग क्रमाक तीनमधुन नामाप्रच्या एका जागेसाठी राजेंद्र राम कुंभार यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध आले आहेत. नामाप्र महीला राखीवमध्ये तेजाबाई वाल्मिक कोळी यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध आले आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतचे २६ सप्टेंबरला मतदान तर २७ सप्टेंबर मतमोजणी आहे.