निर्व्यसनी होऊन आई वडिलांचा सांभाळ करणे हाच खरा परमार्थ: -- सुनंदाताई भोस


पारगाव रिपोर्टर: वाशी तालुक्यातील  पांगरी येथील शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या संत नामदेव संत तुकाराम वारकरी परिषदेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष शिवमती सुनंदाताई टिळक भोस यांच्या विद्रोही कीर्तनाचे आयोजन केले होते.
 गणेश उसत्वनिमित आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात सुनंदाताई भोस यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज लिखित अभंगातून समाज प्रबोधन केले.
तरावया पार भवसिंधु||१||नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान||२||संतसमागमी धरावी आवडी |
या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी समुपदेशन करताना सांगितले की युवकांनी नशेच्या आहारी जाऊ नये,स्वतःच्या पायावर उभे राहून आई वडिलांचा सांभाळ करावा.तरुण युवक व्यसनाधीन झाल्याने आज गावोगावी तरुण बेरोजगार आहेत ,कित्येकजन  मुली मिळत नसल्याने अविवाहित आहेत.तेंव्हा सर्वांनी काळाची पाऊले ओळखुन राहणे गरजेचे आहे.
महिलांनी गर्भपात करू नये,स्त्रीभ्रूण हत्या हे सर्वात मोठे पाप आहे.माझ्या शेतकरी राजाने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करू नयेत. एक दिवस बळीराजचे राज्य येणार आहे ,छ.शिवाजी महाराज ,छ.संभाजीराजे, भगतसिंग हे आपले आदर्श आहेत .त्यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करावं .
आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका,तुमचा जीव खूप अमूल्य आहे.
समाजात सध्या भेडसावत असलेल्या समस्यांवर सुनंदाताई भोंस यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.यावेळी हातोला येथील भजनी मंडळी यांनी टाळ व मृदंगची साथ संगत केली.
या मंडळाचे दीपक जाधव यांनी ताईचा  परिचय देऊन प्रस्तावना केली होती.मंडळाच्या वतीने त्यांचे शाल ,श्रीफळ,देऊन सत्कार करण्यात आला होता.यावेळी विशाल जाधव,संदीप कोकाटे,माऊली जाधव, गणेश कोकाटे,याच्या सह मंडळाचे सर्व सदस्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पारगाव येथील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्यध्यक्ष कॉ.पंकज चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे वाशी तालुकाध्यक्ष आशिष पाटील, माऊली ताटे,संभाजी चव्हाण,अशोक भोरे,धनंजय गोंदवले यांच्यासह एल्गार ग्रुप चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.