रिपोर्टर.. वाशी तालुक्यातील पारगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल ,डिझेलच्या वाढत्या दरवाढी मुळे त्रस्त असलेल्या वाहनधारकांना झेंडू बाम देऊन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
भाजपा सरकारच्या काळात दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत आहे, सरकारने भूल थापा देऊन गोरगरीब जनतेला फसवले आहे.प्रत्येक प्रश्नावर सरकार अपयशी झालेले आहे.आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी वाढली आहे.त्यामुळे आज पारगाव येथील शिवशांती पेट्रोल पंपावर वाहनधारकांना झेंडू बाम देऊन भाजपा सरकारचा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित भाववाढीमुळे देशातील सामान्य जनतेस मोठ्याप्रमाणावर मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लोकांना झालेला हा मनःस्ताप काही प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी मा. आ. राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पारगाव, ता. वाशी येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या ग्राहकांना झेंडू बामचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ. सुरज मोटे, प्रदीप मोटे, दीपक आखाडे, शरद चव्हाण, सुधीर आखाडे, सुशील काटवटे, राम गाढवे, सनी आखाडे, विनोद मोटे, प्रसाद मोटे, गणेश मोटे, चांद तांबोळी, अमर मोटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.