तडवळा येथे गणेश मिरवणूकीमध्ये महीलांचा उत्स्फूर्त सहभाग






रिपोर्टर विकास उबाळे
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येते अंबिका गणेश मंडळ वतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकी मध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .पारंपारिक वेशभूषेत माथ्यावर जलकलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या त्यामुळे मिरवणुकीला आगळे वेगळे स्वरूप आले होते
     दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अंबिका गणेश मंडळाच्या वतीने  श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली या वर्षी मंडळाच्या वतीने आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. मंडळाच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी, बँड, गुलाल या वर पैशाची उधळपट्टी न करता शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली.
        मिरवणुकीमध्ये प्रथम वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत नाशिक ढोल पथकाच्या मागे पारंपरिक वेशभूषेतील डोक्यावर कलश घेतलेल्या महिला , विठ्ठलाची मूर्ती व शेवटी बाप्पांची भव्य मूर्ती.
      मंडळाने नाशिक ढोल पथक तयार केले होते याची एक महिन्यांपासून तयारी सुरू होति. विशेष म्हणजे गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या.
      मिरवणुकीमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीने भाविकांना आकर्षित केले होते .मिरवणुकीमधील विठ्ठलाच्या मूर्तीवर, वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदंगाच्या व ढोल पथकांवर आणि बाप्पाच्या मूर्तीवर भक्तांच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात आली .