उस्मानाबाद तालुक्यातील जि प प्रा शाळा रामवाडी ता उस्मानाबाद येथे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
यावेळी सरपंच श्री पांडुरंग वाकुरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ उमा हाजगुडे यांनी दहीहंडीचे पूजन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ठक्कुरवार जी बी , संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बिभिषण पाटील, नेताजी फंड, बाळासाहेब कांबळे, शिवाजी मोरे, देशपांडे प्रमोद, श्रीमती बारसकर निलावती, वाघमारे प्रतिभा मॅडम आदी उपस्थित होते.
यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी मुला बरोबर मुलींचाही गोविंदा पथकाने तीन थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी प्रयन्त केला. तिसरी ते आठवी च्या मुला मुलींच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. 551 रु चे बक्षीस दहीहंडी फोडण्याचा मान सहावी व पाचवीच्या गोविंदा पथकाने मिळविला. शिक्षिका श्रीमती बारसकर निलावती व वाघमारे प्रतिभा यांच्या पुढाकाराने दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिभीषण पाटील, नेताजी फंड,शिवाजी मोरे,बाळासाहेब कांबळे, प्रमोद देशपांडे ,आशा भोसले यांनी परिश्रम घेतले.