तडवळे येथील जयहिंद विद्यालयात शौर्य दिन साजरा


रिपोर्टर: दि.29 सप्टेंबर 2018 वार शनिवार रोजी जयहिंद विद्यालयात "शौर्य दिन  " साजरा करण्यात आला. यावेळी क.तडवळे गावातील माजी सैनिक अमोल सुधाकर निकाळजे, रोहिदास माणिक भालेराव, .देविदास गणपत करंजकर, पांडुरंग भगत यांचा शाल, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने माजी सैनिक  देविदास करंजकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील आहार, शिस्त, आरोग्य याचे महत्व पटवून दिले. त्याबरोबर प्राचार्य श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावातील उद्योजक श्री. राजाभाऊजी लोंढे, प्रतिष्ठित नागरिक व शिक्षणप्रेमी श्री दिलीप दादा करंजकर, श्री अरुणजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य याकूबजी फकीर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जाधव सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ठाकरे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पालखे सर सह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.