रिपोर्टर...विसर्जनाच्या कालावधीमध्ये पोलीसांना जनतेनेही मदत करावी आसे अवहान उस्मानाबाद चे पोलीस अधिक्षक ए.राजा यांनी आयोजीत पत्रकारपरिषदेमध्ये केले.
दोन दिवसावर येवून ठेपलेल्या गणपती विसर्जनाच्या धरतीवर जिल्हा पोलीस अधिक्षक ए राजा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विसर्जनाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची अनुसूचीत घटना घडु नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 350 जनावर कलम 149 अर्तंगत तडीपारी ची कारवाई करण्यात आली आसुन गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळया प्रकारच्या गुन्हयासंदर्भत 103 केसेस करून 115 आरोपी आटक करण्यात पोलीसांना यश आाले आहे. त्याच बरोबर 8 लाख रूपयाचा मुददेमाल जप्त केल्याची माहीती राजा यांनी दिली. जिल्हयामध्ये एकुन 1200 शे गणेश मंडळ परवानगीचे आहेत. या मडंळाकडुन शासनाने घालुन दिलेले डॅलबी च्या नियमाचे उल्लघंन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्याच बरोबर समाज कंटकाकडुन कुठलाही उचित प्रकार घडल्यास त्यांच्यावर कायदयाने कारवाई केली जाईल आशी माहीती पोलीस अधिक्षक ए.राजा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.