
रिपोर्टर: शिक्षक हे देशाचे भविष्य घडवत आसतात! या वाक्याप्रमाणे सामाजीक बांधीलकी जपुन शिक्षकी पेशाचा सामाजीक दर्जा उचांवण्याचे काम दिलीप चौधरी यांनी आपल्या विविध कौशल्यातुन केले आहे.

स्काउट गाइड मध्ये कब मास्टर:
गेली चार वार्षापासुन आपली सर्व काम संभाळुन स्काउट गाइड मध्ये कब मास्टर म्हणुन ते कार्य करतात.उस्मानाबाद जिल्हयातील विविध ठिकानच्या शाळेतील शिक्षकांसह विदयार्थ्यांना स्ववलंबन,श्रम प्रतिष्ठा,सर्वधर्म समभाव,प्रामाणि्कपणा आणि जिवन जगण्याची शिस्त आशा प्रकारची मुल्य स्काउट गाइड च्या माध्यमातुन विदयार्थी आणि शिक्षकांच्या आंगी रूजवली जातात.आत्तापर्यंत चौधरी यांनी 100 शिक्षकांना प्रशिक्षण दिले आसुन जवळ जवळ 1 हजार विदयार्थ्यांना या माध्यमातुन शिस्तीचे धडे मिळाले आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील धारूर जिल्हापरिषद शाळेतील चार विदयार्थी स्काउट गाइड च्या माध्यमातुन राज्यपुरस्कार प्राप्त झाले आसुन त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी लवकरच निवड होणार आहे. आशाप्रकारे सामाजीक बांधीलकी जपणा—यां शिक्षकांची आजच्या शिक्षण क्षेत्राला गरज आहे.