
विकास उबाळे
तडवळे रिपोर्टर: येथे महाराजस्व अभियान अंतर्गत जयहिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना उस्मानाबाद चे तहसिलदार विजय राऊत यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवार दि 26 सप्टेंबर रोजी जयहिंद विद्यालयात महाराजस्व अभियान अंतर्गत ढोकी मंडळ विभाग यांचे मार्फत प्रशालेतील इ 9 वी ते 12 वी पर्यंतच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत जात प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले, तसेच यावेळी गावातील काही शेतकरी बंधुना 7 /12 चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार श्री. विजय राऊत , मा.मंडल अधिकारी श्री. गोपाळ अकोसकर गांवचे सरपंच श्री मन्मथजी आवटे तलाठी श्री यादव शशिकांत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सुनील वळेकर ,प्राचार्य श्री जाधव सर, पत्रकार श्री विकास उबाळे, श्री नूरजी शेख, भाऊजी सुरवसे, पोपट जमाले, श्री निकम ,पाटील सर ,पालखे सर सह आदींची उपस्थित होती
यानिमित्ताने तहसीलदार राऊत व शिक्षक जाधव यांनी आपल्या प्रोत्साहन पर भाषणातून विद्यार्थ्यानी जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून भविष्यात मोठे अधिकारी होण्यासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकरे
यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.