नॉट अ ब्रेंकींग न्युज चित्रपटाचा स्क्रिनींग शो उस्मानाबादमध्येरिपोर्टर...नॉट अ ब्रेंकींग न्युज चित्रपटाचा  स्क्रिनींग शो उस्मानाबाद येथिल श्री चित्र मंदीर येथे घेण्यात आला.या चित्रपटामध्ये उस्मानाबाद येथिल अभिनेते राहुल कुलकर्णी यांची महत्वाची भुमीका आहे.   आजच्या जलद युगात विविंध प्रकारच्या माध्यमाची ब्रेंकींग न्युज काही वेळा सर्वसामान्याच्या आयुष्यात जगण्याचा ब्रेंक देवून कशाप्रकारे सर्व उधवस्त करण्याचे काम करते याची तत्वनिष्ठ माहीती या चित्रपटाच्या माध्यमातुन मांडण्यात आली आहे. त्याच बरोबर 
 हा चित्रपट म्हणजे व्यवस्थेच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाचं जगणं कसं कस्पटासमान आहे.आणि प्रस्थापित व्यवस्था ते आपल्या स्वार्थासाठी कसं क्रूरपणे चिरडून टाकते यावरचं अत्यंत दाहक असं भाष्य आहे.प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात सर्वच कलावंत व दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत.सर्वच कलावंतांचं व दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञांचं या वेळी कौतुक करण्यात आले.