उस्मानाबाद, शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान देशभरात राबविण्यात येत असून या अभियानात जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपले गाव, शाळा-अंगणवाडी व परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.नेताजी पाटील यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान शुभारंभ व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 चे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, उपाध्यक्षा श्रीमती. अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.मधुकर देशमुख, कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमणशेटे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती सखुबाई पवार, जि.प.सदस्य श्री.महेंद्र धुरगुडे, श्री.प्रकाश चव्हाण, श्रीमती.अस्मिता कांबळे, श्रीमती सक्षणा सलगर, श्री.उध्दव साळवी, पंचायत समिती सभापती श्रीमती. ज्योतीताई पत्रिके, सभापती श्री. शिवाजी गायकवाड, उपसभापती श्री. विष्णुपंत मुरकुटे, गट विकास अधिकारी श्री. राजकुमार कांबळे, श्री.बी.आर.ढवळशंख, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 मधील बक्षीस प्राप्त ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच विस्तार अधिकारी (पंचायत) व ग्रामसेवक उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष श्री.नेताजी पाटील म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चे काम शाश्वत झाले असुन शौचालय सुविधांचा सर्वांनी नियमित वापर करावा. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध अभियान राबविण्यात येतात. लोकसहभाग ज्या गावात मिळाला त्या गावांचा कायापालट झाला आहे. “स्वच्छता ही सेवा” या विशेष अभियानातून गावस्तरावर स्वच्छते विषयी मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. गावस्तरावर शाश्वत स्वच्छतेसाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी बोलताना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते म्हणाले की, “स्वच्छता ही सेवा” या अभियानानिमित्त विविध माध्यमांतून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासोबत पाण्याचे स्त्रोत तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान दिनांक 2 ऑक्टोंबर 2018 पर्यंत चालेल. दिनांक 17 ते 30 सप्टेंबर दरम्यान शौचालय निर्मिती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान व समग्र स्वच्छता, भरलेल्या शोषखडयांचा उपसा करणे, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी इ.तर दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी पर्यटनस्थळे साफसफाई व दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी तालुका व गावस्तरावर महाश्रमदान तसेच स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्व स्तरावरील लोक प्रतिनिधी, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभाग अस्मिता उपक्रमांतर्गत जोडलेल्या महिला ,अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी सदस्य यांनी योग्य नियोजन करुन शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार उपक्रम राबवावेत, असे आवाहन ही केले. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातुन दोन ग्रामपंचायतींनी गोबर-धन योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे व चालु वर्षात जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग असणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या शुभारंभप्रसंगी तुळजापुर पं.स.चे सभापती श्री.शिवाजी गायकवाड यांनी जिल्हा हागणदारी मुक्तीच्या पुढील टप्पा म्हणजे शाश्वत स्वच्छता असुन याविषयी मार्गदर्शन केले.
बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलताना जि.प.उपाध्यक्षा श्रीमती अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, स्वच्छतेच्या रुपाने लक्ष्मी घरात आली असून सर्वांनी तिचे आनंदाने स्वागत करावे, असे त्यांनी विचार मांडले.
त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या सुधारित मार्गदर्शक सुचना, स्वच्छता ही सेवा अभियान अंमलबजावणी, शाश्वत स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी इत्यादी विषयी उपस्थितीतांना सादरीकरणद्वारे माहिती देण्यात आली.
दुपारच्या सत्रात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, उपाध्यक्ष श्रीमती. अर्चनाताई पाटील यांचे हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 मध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीस प्राप्त चौवीस ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र, बक्षीस रक्कम, ग्रामगिता व स्वच्छता साहित्याची किट देवुन ग्रा.पं.चे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 मध्ये उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच तालुक्यांनी उत्कृष्ट सहभाग घेवुन मोबाईलद्वारे विभागात सर्वाधिक अभिप्राय नोंदविल्याने उस्मानाबाद जिल्ह्याचा विभागात प्रथम क्रमांक आल्यामुळे जिल्हयातील आठही तालुक्यांना प्रमाणपत्र, ग्रामगिता व स्वच्छता साहित्याची किट देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमाकांत गायकवाड व आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख
यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील संवाद सल्लागार हनुमंत गादगे, श्रीमती शोभा टेकाळे, रुषीकेश डुमणे, वैभव गिरी, प्रदीप कांबळे, लक्ष्मण मांजरे व देवानंद खबोले यांनी परिश्रम घेतले.
वृत्त.क्रमांक.201
महाश्रमदानात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन
उस्मानाबाद, दि. 21:- केंद्र शासनाद्वारे “स्वच्छता ही सेवा” अभियान दि.15 सप्टेंबर 2018 ते 02 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत राबवून राज्यात व जिल्हयात स्वचछतेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी देशभर महाश्रमदान दिवस निश्चित केलेला आहे.
या दिवशी सकाळी 10 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील येरमाळा ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हास्तरीय महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी येरमाळा क्षेत्रात महाश्रमदान करणेसाठी येरमाळा स्थानिक गावातील व तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, उमेद अंतर्गत कार्यरत सर्व महिला बचत गटांचे महिला, स्वच्छागृही, नागरिक व ग्रामस्थ यांनी सहभाग घ्यावा.
याच दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाश्रमदानसाठी तालुक्यातील एक प्रसिध्द ठिकाण किंवा एका गावाची निवड करुन तालुक्यातील अनेक स्वच्छाग्रहींना दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी एकत्रीत यावे व श्रमदान करण्यासाठी या उपक्रमांमध्ये स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व ग्रामस्थांचा सहभाग घेवून महाश्रमदान करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*****