पारगाव येथे सरगम संगीत क्लासेसचे उदघाटन:







रिपोर्टर :- वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य सामाजीक,शैक्षणिक, व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष प्रवीण डोके यांनी सरगम संगीत क्लासेसचे आज शिक्षक दिनाच्या औचित्याने यशस्विनी अभियानाच्या राज्य समन्वयक तथा आ.राहुल मोटे यांच्या पत्नी वैशाली मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला पारंगावच्या सरपंच सत्यशीला गायकवाड ,नामदेव चव्हाण संगीत विशारद, सोहेल मुलाणी संगीत विशारद यांची प्रमुख उपस्थिती मध्ये या संगीत क्लासेस चे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून रेबिन कापण्यात आली.यावेळी सोहेल मुलाणी यांनी स्वागत गीत गाऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी या ठिकाणी आलेल्या नागरिकाना उद्देशून बोलत असताना म्हणाल्या की प्रत्येकाच्या अंगात गाणं ही कला असते.मग ही कला काही विकसित करतात तर काही स्वतःपुरत गुण गुण न्या इतपत ठेवतात.मात्र गाणं ,वादन, एकंदरीतच ताल हा प्रत्येकाला असतो.आज पाहिलं तर प्रत्येक जण मोबाईल च्या जमान्यात मोबाईल चळण्यात व्यस्त आहे.प्रत्येकांनी थोडा वेळ स्वतः साठी देऊन ह्या गायन,वादनाच्या कला अंगीकारायला हव्यात,जेणे करुन मन प्रसन्न राहील व कोणाचीही चीड चीड होत नाही.कला ही काही ऐका दिवसात किंवा काही महिन्यात शिकण्याची कला नाही.त्यासाठी साधना महत्वाची आहे.
या सरगम संगीत क्लासेस मुळे ग्रामीण भागातील संगीत प्रेमींना संगीत शिकण्याची नवीन संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल डोके कुटुंबाचे मी आभार मानते.  स्पर्धात्मक कार्यक्रम घ्या  मी सदैव आपणा सोबत असेल असे प्रतिपादन त्यांनी केले .
त्याच बरोबर नामदेव चव्हाण संगीत विशारद पाखरूडकर यांनीही या संगीत क्लासेस ला राजाश्रय आवश्यक लागतो आणि तो आपण द्यावा असे आवाहन त्यांनी केले.तर संगीत विशारद सोहेल मुलाणी यांनी विविध गीत सादर करून कर्यक्रमात वेगळीच रंगत आणली होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक जाधव यांनी केले तर आभार अर्चना डोके यांनी केले.
या कार्यक्रमाला विकास तळेकर,श्रीराम आखाडे,ग्रा.प.सदस्य बाबासाहेब सोनटक्के,डॉ.प्रशांत मोटे,प्रदीप मोटे,दीपक आखाडे,राजेंद्र आखाडे,महेश आखाडे,त्रिंबक गोंदवले,डी.बी.मोटे,रामकृष्ण जोगदंड,लक्ष्मण शिंदे,सोमनाथ इटकर,बजरंग मोरे,सुधीर आखाडे,यांच्या इतरही नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.