.

.
लातुर रिपोर्टर...गणेश उत्सवानिमित्त संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह,लातूर या बालगृहतील अनाथ मतिमंद मुलांनी गणपतीच्या अतिशय सुरेख मूर्ती स्वतःच्या हातानी साकारल्या व या गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी बालगृहाच्या वतीने टाऊन हॉल,लातूर येथे स्टॉल लावण्यात आला या स्टॉल चे उदघाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे तसेच बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सौ.व्यास तसेच माजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.बिराजदार व बालकल्याण समितीच्या सदस्या सौ. कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री. आण्णासाहेब कदम तसेच बालगृहतील कला व विशेष शिक्षक व बालगृहतील अनाथ मतिमंद मुले उपस्थित होते,उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे मार्गदर्शक आण्णासाहेब कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, उदघाटना नंतर सर्व मान्यवरांनी अनाथ मतिमंद मुलांनी बनविलेल्या गणेश मूर्ती खरेदी केल्या, समाज कल्याण अधिकारी श्री. मिनगिरे व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. व्यास यांनी उपस्थित अनाथ मतिमंद मुलांच्या कलेचे भरभरून कौतूक केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.