विरोधकांना राष्ट्र आत्मनिर्भर व बलशाली करणारा पक्ष सत्तेत नको - विजय चौधरी

 
ओबीसी मोर्चाची  आढावा बैठक संपन्न 
उस्मानाबाद  , रिपोर्टर 
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची आढावा बैठक शहरातील हॉटेल जत्रा येथे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खाली संपन्न झाली. या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना श्री चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, पवार साहेबांनी भाजपा सत्तेतून पाय उतार व्हावं अशी आंतराष्ट्रीय समूहाचीही इच्छा असल्याचे सांगितले आहे. याचा आर्थ चीन व  पाकिस्तान प्रमाणेच पवार साहेबांना राष्ट्राला आत्मनिर्भर व बलशाली करणारा पक्ष सत्तेत नको आहे. आणि म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारला चारही बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केले जात आहे. श्री. चौधरी पुढे म्हणाले, चाणक्य म्हणतात की, देशाचा राजा प्रामाणिक असला कि, सर्व चोर एकत्र येतात, हिच परस्थिती केंद्रात आणि राज्यात बघण्यास मिळत आहे. त्या मुळे प्रत्येक पदाधिकारी व सदस्यांनी खंबीरपणे पक्षकार्य करावे असे आवहान त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
 यावेळी व्यासपीठावर उस्मानाबाद शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा ओबीसी मोर्चाचे महामंत्री व लातूर मनपाचे उप महापौर देविदास काळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय भोळे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सर्वश्री नितीन काळे,सुधीर पाटील,खंडेराव चौरे,अनिल काळे,जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख,  जिल्हा अध्यक्ष डॉ. गोविंद कोकाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्तजी गोरे,जेष्ठ नेते कोंडप्पा कोरे, दत्ता सोनटक्के,संदिप कोकाटे,नानासाहेब घाटगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबीसी जिल्हा सरचिटणीस प्रमोद बचाटे,महेंद्र बिदरकर, अतुल राठोड,गणेश एडके, श्रीराम मुंबरे,भास्कर बोदर, शिवाजी कोरे,धनंजय वायसे आदी पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले


कार्याक्रमापूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करुन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
 श्री चौधरी पुढे म्हणाले की, सर्वत्र अत्यंत कठीण परस्थिती असतांना केंद्र व राज्य सरकारने विकासाचे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठत आहे. म्हणूनच सरकारच्या विरोधात कट कारस्थान केले जात आहे. त्यात सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही सहभागी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले कि, सरकार जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाला बांधील आहे, म्हणून केंद्रातील भाजपा नेतृत्वातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनते पर्यन्त पोहचविण्याची सूचना केली.

विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास संपवून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या संवाद से संपर्क या अभियानानिमित्ताने उस्मानाबाद मध्ये श्री चौधरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी श्री चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमा प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री  चौधरी यांनी पदाधिका-यांना ओबीसी समाजातील 348 जाती पैकी आपल्या शहरात असलेल्या जातींच्या अंतर्गत संघटनांच्या नेतृत्वापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्याचे निर्देश दिले. येत्याकाळात संबंधीत समाजाच्या समस्या व मागण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आसल्याची माहिती दिली.  या वेळी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री कुलकर्णी, लातूर मनपाचे उप महापौर व ओबीसी मोरच्याचे महामंत्री श्री काळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या दरम्यान, केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.  कार्यक्रमा प्रसंगी जिल्हयातील मंडळ  अध्यक्ष, पदाधिकारी मोठया संख्येने  उपस्थित होते.