पद्मीनी पतसंस्था ११ टक्के लाभांश देणार- मोरेउस्मानाबाद : पद्मीनी महिला सहकारी पतसंस्था सभासद, ठेवीदार, खातेदार व कर्जदारांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे़ पतसंस्थेने २५ कोटी उलाढालीचा टप्पा पार केला असून, पावणे अकरा लाख रुपये नफा झाल्याने सभासदांना यंदा ११ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा पतसंस्थेचे संस्थापक सिद्धेश्वर मोरे यांनी केली़
उस्मानाबाद येथे आज (दि़५) पद्मीनी महिला पतसंस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वयंवर सभागृहात संपन्न झाली़ सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या चेअरमन सुरेखा मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक बाळासाहेब काकडे (पुणे), बडोदा बँकेचे व्यवस्थापक किरण एकशिंगे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारमुर्ती राजकुमार सोमवंशी आदींची उपस्थिती होती़ अहवाल वाचनात श्री मोरे यांनी म्हटले, पतसंस्थेने एक हजार सभासद नोंदणीचा टप्पा पार केला आहे़ पावणेसात कोटी तर तीन कोटीपेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज वितरण केले आहे़ सुमारे २५ कोटी रुपये उलाढालीचा टप्पा पार केला आहे़ पतसंस्था सलग ७ व्या वर्षी नफ्यात असून यंदा १० लाख ७५ हजार निव्वळ नफा प्राप्त केला आहे़ त्यामुळे यंदा सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे श्री मोरे यांनी जाहीर केले़ श्री मोरे, रणदिवे यांनीही आपले विचार व्यक्त केले़ तत्पूर्वी सभासदांच्या गुणवंत पाल्यांसह शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री सोमवंशी, लेखिका श्रीमती काकडे तसेच कर्जपरतफेड करणारे सभासद आदींचा विशेष सन्मान करण्यात आला़ यावेळी संचालिका ज्योती खुने, अरुणा निकम, वनमाला उंबरे, स्वाती मुळे, उर्मिला साळुंके, शालिनी कुलकर्णी, इंदूमती थडवे, सुरेखा माने, रुक्मिणी पाटील, चंद्रलेखा मोरे, सतीश पांढरे, किरण निंबाळकर, व्यवस्थापक संतोष मोरे, कर्मचारी बालिका ढगारे, ज्योत ढगे, वैशाली मोरे, मिलिंद उंबरे, योगेश्वरी ढगे आदी उपस्थित होते़ या सभेचे सुत्रसंचालन व आभार विजयकुमार कुलकर्णी व सरोजा उंबरे यांनी व्यक्त केले़ सभेस सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़
काटकसरीमुळे पतसंस्था नफ्यात
पतसंस्थेचा कारभार अत्यंत काटकसरीने केल्यामुळेच सलग ७ व्या वर्शी संस्था नफ्यात आली आहे़ यापुढेही असाच कारभार ठेवण्याची ग्वाही संस्थापक सिद्धेश्वर मोरे यांनी बोलताना दिली़