एचडीएफसी बॅंक कर्मचा—यांचा स्वआधार केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांना आधार!

रिपोर्टर... एचडीएफसी बॅंकेच्या उस्मानाबाद शाखेतील कर्मचा—यांच्या वतीने स्वतंत्रदिनाचे औचित्य साधुन उस्मनाबाद येथील स्वआधार केंद्रातील दिव्यांग मुलांना शैक्षणीक साहीत्यासह खाउचे वाटप करण्यात आले. हा साहीत्य वाटपाचा कार्यक्रम सुर्याजी कदम यांच्या हास्ते झाला. यावेळी एचडीएफसी बॅंकेतील कर्मचारी महादेव मगे,आतुल देशपांडे,महेश टकले,समीर होळीकर,अभिजीत जगदाळे,विशाल मगर,अश्वीन गोरे,यश ओहाळ,यांच्यासह शहरातील संजय मंत्री,स्वप्नील आजमेरा, विनोद विर,त्याच बरोबर स्वआधार केंद्रातील शिक्षक वृंद उपस्थित होते.

उस्मानाबाद येथील एचडीएफसी बॅंकेतील कर्मचा—यांनी 15 आॅगस्ट या स्वतंत्र दिनाच्या निमीत्ताने गडपाटी उस्मानाबाद येथे आसना—या स्वआधार केंद्रामध्ये शिकत आसना—या दिव्यांग विदयार्थ्यांना खाउ सह शैक्षणीक साहीत्याचे वाटप केले.