पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयातील सेवक अच्युतराव डोके यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार.




पारगाव रिपोर्टर..  वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवक अच्युतराव डोके हे आज सेवानिवृत्त झाले .त्या निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक पोशाख ,पुष्पहार ,फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व्ही.जी.पवार,सेवा निवृत्त शिक्षक धोंडीराम बटुळे,बजरंग मोरे,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार देशमुख होते,
या कार्यक्रमाला  गावातील कुंडलीक आखाडे,ग्रा.प.सदस्य बाबासाहेब सोनटक्के,सिताराम कुलकर्णी,बंडू मुळे, त्रिंबक गोंदवले,सोमनाथ इटकर, रुईचे माजी सरपंच जीवनराव उंद्रे,अरुण घाडगे,दीपक जाधव चंद्रहान्स माने,यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.बँकट स्वामी शिक्षण संस्थेच्या खडकी( घाट) व घुमरा पारगाव येथील शाळेच्या वतीने डोके यांचा सत्कार करण्यात आला.ग्रा.प.सदस्य बाबासाहेब सोनटक्के यांनीही संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा व फेटा बांधून सत्कार केला.तर पारगाव येथील कन्या प्रशाला च्या वतीनेही सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुरवसे,व त्यांच्या सहकारी यांनीही सत्कार केला.
या सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमावेळी उपस्थितांनी अच्युतराव डोके यांच्या कार्यकाळा बाबत मनोगत व्यक्त केली.प्रमुख वक्ते व्ही.जी.पवार यांनी सांगितले की संघर्ष काय असतो अन संघर्षावर मात करून मिळवलेले यश काय असते हे पहायचे असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे अच्युतराव डोके आहेत.संस्था चालकाशी दहा वर्षे न्यायालयीन लढा देत एकूण 14 उपोषणे गाव ते मुंबई पर्यंत करून न्यायालयाचा निकाल जिंकत सेवेत रुजू होणे ही साधारण बाब नाही.त्यामुळे संघर्ष केला तर फळ हे मिळतेच याचे उत्तम उदाहरण म्हणजे डोके आहेत.
या वेळी डोके यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी शाळेतील मोरे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली होती.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विक्रम भोसले,तोडकर,सिद्धेशवर शहाणे,राठोड सर,अरुण आखाडे,भोसले सर,कांबळे सर,यांच्या सह शाळेतील प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विध्यार्थी व आलेल्या पाहुण्यांना जेवणाची सोय सत्कारमूर्ती अच्युतराव डोके यांनी केली होती.