उस्मानाबादेत पहिल्यादाच लेडीज जीमचे उद्घाटन,




रिपोर्टर...शहरातील उंबरे कोठा भागातील स्लीम लेडीज फिटनेस क्लब या महिला व्यायामशाळेचे उद्घाटन शहरातील विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. पहिल्याच दिवशी अनेक महिलांनी नोंदणी केली.

-

महिलांच्या आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत असताना व्यायामाचा अभाव, वेळोवेळी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या वाढतच जातात. दैनंदिन धावपळीत व्यायाम होत नसल्याने तसेच व्यायामाबाबत अनभिज्ञता असल्याने व्यायामशाळा गरजेच्या बनल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील उंबरे कोठा भागात खास महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. या व्यायामशाळेतून महिलांना आरोग्यविषयक माहिती तसेच व्यायाम प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुसज्ज, प्रशस्त हॉल, अत्याधुनिक ट्रेड मिल, इलेफ्टीकल बाईक, स्पेन बाईक, वायब्रेटर, ट्विस्टर, मल्टीजीम, अशा अनेक प्रकारच्या साहित्यासह महिला ट्रेनर असलेल्या ‘स्लीम लेडीज फिटनेस क्लब’ या जीमचे उद्घाटन सोमवारी(दि.६) शहरातील विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काही डॉक्टर महिलांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्या तसेच अाहार, व्यायामाची माहिती दिली. या जीममध्ये महिला डॉक्टरमार्फत प्रवेश घेतलेल्या महिलांची महिन्याला मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.वसुधा दापके-देशमुख,नगरसेविका प्रेमाताई पाटील,संगीता पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे,वर्षाराणी कुदळे, कल्पना शानमे, योगिता जगदाळे, अर्चनाताई शिनगारे,मीरा जगताप, सीमा पाटील, सृष्टी शेळके, सुमन पवार, मंगल गडकर, संगीता देशमुख, मीना घाटगे, रागीणी पाटील, वर्षा जाधव,अलका गांगुर्डे,कौशल्या डोके,सुप्रिया उंबरे, अर्चना उंबरे, बालिका सावंत आदी महिला उपस्थित होत्या.सुजाता देशमुख, ऋतुजा देशमुख यांनी मान्यवर महिलांचा सत्कार केला.