गरूदेव इंग्लिश स्कुलच्या विदयार्थ्याकडुन भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या राख्या




रिपोर्टर..माजी सैनिक नवनाथ मोटे यांना राखी बांधून श्री गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कुल च्या वतीने  भारतीय जवानांना राख्या पाठण्यात आल्या.
उस्मानाबाद ज्ल्हियामध्ये वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य सामाजिक,शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या श्री गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कुल च्या वतीने भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राख्या पाठवण्यात आल्या.
या वेळी स्कुल च्या विद्यार्थ्या कडून बनवण्यात आलेल्या राख्या  आणल्या होत्या या मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले.तीन वर्गातून निहारीक आखाडे,शिवदीप डोके,गुड्डी मोटे,हराळे, यश कोठावळे,शरयू आखाडे,काटवटे या विद्यार्थ्यांचे क्रमांक आले ,या विद्यार्थ्यांना चित्रकला  वही, पेन्सिल,इरेजर,शॉपनर भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी सैनिक नवनाथ मोटे,सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कोठावळे,शिक्षण प्रेमी असणारे सीताराम कुलकर्णी, उमेश महाडिक,प्रदीप मोटे,महादेव काळे,संस्थेचे अध्यक्ष प्रवीण डोके, सचिव कल्पना जाधव  पत्रकार राहुल डोके,विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेडटीचर अर्चना डोके यांनी केले.तर यावेळी सीताराम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साबळे मॅडम,खवले मॅडम,भराटे मॅडम यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.सदरील राख्या भारतीय डाक पोस्टा ने पाठवण्यात आल्या.