उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील भैरुल्ला शहा कादरी दर्गाहा चा उरूस उत्सहात साजरा

रिपोर्टर विकास उबाळे 


कसबे  तडवळे येथील भैरुल्ला शहा कादरी दर्गाहा चा उरूस दि 31 आगस्ट रोजी संपन्न होत आहे पहिल्या दिवशी संदल मिरवणूक काढण्यात येते दुसऱ्या दिवशी उरूस व कव्वाली चा मोठा कार्यक्रम होतो व तिसऱ्या दिवशी जिरायत होऊन उरूसाची सांगता होते

भारतीय संस्कृती ही महान आहे जसे एखादया बागेत अनेक प्रकारची फुल झाडी असावीत तशी भारतात विविध प्रकारच्या जातीधर्माचे लोक विविध भाषा ,प्रांत व पेहरावात आढळतात त्याचे  स्वहिताबरोबरच राष्ट्र हित, राष्ट्रीय एकात्मता याकडे अधिक लक्ष असते जातीव्यवस्थेची बंधने पूर्णतः गळल्याशिवाय देशहित नाही हे चांगलेच उमजले आहे एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होणे धार्मिक कार्यक्रम असो वा सामाजिक किंवा व्ययक्तिक कार्यात हातभार लावणे हा भारतीयांचा उपजत गुण आहे त्याला उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे हे गावही मागे नाही
      क तडवळे गावची लोकसंख्या 16हजाराच्या आसपास असून या गावात विविध जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात गावात अनेक उस्तव ,सण व इतर धार्मिक कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्याने पार पडण्याची प्रथा आहे गावच्या पूर्वेला भैरूला शहा दर्गा ,पश्चिमेला पुरातन श्रीराम मंदिर तर दक्षिण बाजूस भवानी मातेचे मंदिर आहे ही सर्व दैवतं गावाची आराध्यदैवत मानली जातात गावाला ऐतिहासिक वारसा असल्याने रामनवमी व नवरात्र महोत्सवाबरोबर उरूस ही मोठया उत्साहात साजरा हितो
       दरवर्षी बकरी ईद झाल्यानंतर उरूस साजरा केला जातो यावर्षी दि  31 आगस्ट पासून उरूसास सुरवात होत आहे  उरूस उत्सवाचे वैशिष्ठे असे की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे व ऐक्याचे दर्शन घडते उरूस मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम पार पाडण्यासाठी धडपड असतात या दर्गा वर उरूसाचा महत्व पूर्ण विधीसाठी गावच्या पाच पाटलांचा महत्वाचा मान असतो हे पूर्वापार चालतं आलेले आहे
       उरूसाच्या आदल्या दिवशी गोपाळवाडी  येथून भैरूला शहा दर्गाहवर  चादर चढविण्यासाठी घोड्यावरून गुलाबाचं फुल आणन्याची प्रथा आहे त्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते तसेच रात्री मुजावर वाड्यातुन संदल मिरवणूक काढून संदल पाच पाटलांच्या हस्ते दर्गाहवर चादर चढवितात   दुसऱ्या दिवशी गावातील व परिसरातील असंख्य हिन्दू - मुस्लिम बांधवची नारळ व मलिदा तसेच नवसाच्या वस्तूसह दिवसभर दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात व परिसरात पाळणे ,विविध दुकाने रोषणाई यामुळे परिसराला मोठया यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते श्रद्धेचा भावनेतून आजही ग्रामीण भागात मोठया प्रमाणात नवस बोलले जातात
उरूसाच्या यात्रा काळात प्रमुख आकर्षण म्हणजे कव्वालीची जुगलबंदी विदूत रोषणाई व शोभेची दारूची आतिषबाजी मन मोहून टाकते हा गावाचा उरूस ग्रामदैवत म्हणूनच साजरा होतो यादिवशी गावातील प्रत्येक घरात सणा प्रमाणे वातावरण असते व तिसऱ्या दिवशी  जिरायत चा कार्यक्रम करून उरूसाची सांगता होते 

या उरूस कमिटीचे अध्यक्ष महेबूब मुजावर ,अल्ताफ मुजावर ,जॅकीर मुजावर सह सर्व उरूस कमिटी यांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे तसेच ढोकी पोलीस स्टेशनचे api गणपत जाधव यांनी या उरूसाच्या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे
(या दर्गा मध्ये गावचे  प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांनी दर्गा वर सुमारे दीड लाख रुपयांचे झुंबर भेट दिल्याने यात आणखीन शोभा वाढली आहे )