बारा वर्षाच्या मुलीने गळफास घेवून केली आत्महत्या : उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यातील घटना.




रिपोर्टर :-उस्मानाबाद जिल्हयामध्ये वाशी तालुक्यातील जनकापूर या गावामध्ये आवघ्या 12 वर्षाच्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. 22 रोजी घडली आहे. येथील पारगाव ग्रा.प.चे सदस्य गौतम पांडुरंग वायसे यांची मुलगी प्रिया गौतम वायसे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही.
प्रिया हि पारगाव येथील कन्या प्रशाला येथे इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती  तीने राहत्या घरी दुपारी 2 च्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.सदरील घटना  ही घराच्या पाठीमागे घडल्याने तिच्या आईने पहिल्या नंतर तिला चौसळा ता.जी.बीड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्या ठिकाणी असणाऱ्या वैधकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले.त्या नंतर शवविच्छेदन केल्या नंतर जनकापूर येथील वायसे वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या आधी जनकापूर येथील सौरभ दिनकर कोकणे या इयत्ता चौथी च्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने दोन महिन्या पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलांच्या डोक्यावरील वाढत आसलेला मानसीक तान आशा घटनासाठी कारनेभूत ठरत आसेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.