मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ भूम शहर कडकडीत बंद
भूम-रिपोर्टर ....   सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाज्याला आरक्षन मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती.
या मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे,मेघभरतीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी,काका शिंदे यांच्या नातेवाईकांना तीस लाख देण्यात यावे.
जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोनत्याही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देनार नाही आशा मागण्यांचा सुर मराठा बांधवाचा होता, कोनताही आनुचित प्रकार न घडता लोकशाहीच्या मार्गाने 100% बंदला प्रतिसाद मिळाला, हे बंद यशस्वी करण्यासाठी प्रा.अरूण गाढवे,मा.नगरसेवक रूपेश शेंडगे,आशोक मस्कर,अनिल शेंडगे, गणेश दिनानाथ शेंडगे, आतुल सपकाळ, नितीन डोके, उदयराजे सस्ते,औंदुबर जाधव,सर्व एक मराठा, लाख मराठा बांधव उपस्थित होते.