शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता
नागपूर,रिपोर्टर.. शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता दिलेली असून काही शिक्षकांच्या नियुक्त्या नियमाप्रमाणे केल्या नसल्याने चौकशी सुरु असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत शासनाने विविध आदेश काढून निर्बंधातील अटी शिथील केल्या आहेत. तसेच अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळांमधील पदांच्या मान्यतेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.