राष्ट्रसंत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांना कमी लेखनाऱ्या मनोहर भिडे यांच्या पुळयाचे दहन..


 उस्मानाबाद रिपोर्टर... वाशी तालुक्यातील पारगाव येथे जोग महाराज आश्रम महाकाळा ता अंबड जी जालना येथून पंढरपूर येथे जाणार पालखी सोहळा पारगाव येथे मुक्कामी असतो.आज पारगाव येथे मुक्काम करून पुढचा प्रवास करते वेळी पारगाव येथे सकाळी 6:30 वाजता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे राज्य अध्यक्ष कॉ.पंकज चव्हाण यांच्या पुढाकाराने दिंडीचे चालक ह.भ.प.गु.महंत अर्जुन महाराज जाधव गोरक्षदल मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांना कमी लेखत ,यांच्या पेक्षा मनू हे श्रेष्ठ होते हे वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या वेळी दिंडीतील दिडशेच्या वर असणाऱ्या वारकरी पुरुष व महिलांनी मनोहर भिडे यांचा जाहीर निषेध करत.राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचा जय जय कार केला.तर मनोहर भिडे मुर्दाबाद च्या घोषणा देत.छ.शिवाजी महाराज यांचा जय जय कार करण्यात आला.यावेळी दिंडीतील ह.भ.प.संदीप खरात,यांच्या सह वारकरी उपस्थित होते तर पारगाव येथील प्रवीण डोके,धनंजय गोंदवले, पत्रकार राहुल डोके,आकाश शिंदे,भाई.रामचंद्र आखाडे,महेश गोंदवले, अशोक भोरे,संभाजी चव्हाण,यांच्यासह युवक उपस्थित होते.