पारगाव येथे बंद ला मोठा प्रतिसाद ...काकासाहेब शिंदे यांना मराठा युवकांकडुन श्रद्धांजली




पारगाव रिपोर्टर.. - सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला पारगाव येथे उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.पारगाव येथे सकाळ पासुन मराठा समाजाचे तरुण व्यापारी ,दुकानदाराना बंद साठी आवाहन करत होते,या आवाहनास प्रतिसाद देत पारगाव कडेकोट बंद करण्यात आले.यावेळी पारगाव येथील माध्यमिक शाळा,जी.प.शाळा सह पिंपळगाव(क),जनकापूर,हातोला,गावातील शाळा विद्यालय ,बँक बंद ठेवण्यात आले होते.
या वेळी सकाळी बस स्थानक येथे मराठा बांधवकडून गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील मराठा योद्धा काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अशोक शिंदे,दिपक आखाडे, पत्रकार राहुल डोके,प्रदीप मोटे,महेश आखाडे,प्रवीण डोके,अमोल मोटे,किशोर आखाडे, माऊली ताटे,पांडुरंग मोटे,अमित मोटे,पोपट भराटे, महेश मोटे, विनोद मोटे,अजय आखाडे,समाधान उंदरे,शुभम मोटे,शुभम मोटे,सुदर्शन नारटा,रोहित आखाडे,पंडित चंदनशिव यांच्या सह इतर मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.