रिपोर्ट महाराष्ट्र लाईव्ह
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. बीड जिल्ह्यात परळीत बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आंदोलकांनी दुपारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच होते.
हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्यात परळीतील आंदोलनाला पाठिंबा देत विविध पक्ष व संघटनांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. शनिवारी शिवसंग्रामचे
आ. विनायक मेटे व इतर पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. शनिवारी औरंगाबादला क्रांती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
लातूर, परभणी, नांदेडमध्ये आंदोलन
लातूर जिल्ह्यात रेणापूर बंदची हाक देण्यात आली होती़ त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औसा येथे रास्ता रोको झाला. परभणीत पाथरी व सेलू येथे शनिवारी आंदोलन झाले. पाथरी येथील चक्काजाम आंदोलन झाले.
नांदेड येथे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील स्वत: आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.सोलापूरातील मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, दोन एसटी गाड्यांची तोडफोड.
सोलापूर
मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून हिंसक वळण लावले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़ मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणार्या महाविद्यालयांनी मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले.
महाराष्ट्रासह भारतात शांततामयरित्या निघालेला ५८ मराठा मुक मोर्चामुळे सामाजिक जीवन ढवळून गेलेले आहे़ सर्व मराठा मोर्चामध्ये मराठा आरक्षण व मराठा कुणबी समाज एकच असल्याचा प्राधान्याने उल्लेख झालेला आहे़ मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या ५८ व्या मुकमोर्चावेळी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़ म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या दुसºया पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़
अन्यथा राज्यभर वणवा पेटेल आ़. भारत भालके
मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिकाऱ्यामध्ये किरकोळ वादावादी झाली़
पंढरपूर शहरात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड व संभाजी ब्रिगे्रडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले़ यावेळी पोलीसांनी रामभाऊ गायकवाड व किरण घाडगे यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके यांनी या आंदोलनकर्त्यांना अटक करू नका असे सांगितले़
यावेळी पोलीसांनी अटक करून सोडून देतो असे म्हटले़ यावेळी आ़ भारत भालके यांनी त्यांना अटक करू नका अन्यथा राज्यभर वणवा पेटेल असे सांगितले, मात्र पोलीस आ़ भारत भालके यांची गोष्ट ऐकली नाही त्यामुळे पोलीस अधिकारी व आ़ भालके यांच्यात किरकोळ वादावादी झाली़