उस्मानाबाद रिपोर्टर..- उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले मोईनोद्दीन काझी यांचा मुलगा विमान पायलट झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिला मुस्लिम पायलट होण्याचा बहूमान काझी कुटूंबाला मिळाला आहे
उस्मानाबाद येथील मोईनोद्दीन काझी यांचे ताजमहल सिनेमा टाँकिजच्या काँम्लेक्समध्ये हिना मोबाईल शाँपीचे दुकान आहे त्यांनी आपल्या मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी मुलाला पायलट बनवाण्याचे धेय मनात धरून सन २०१४ साली उस्मानाबाद येथील विमानतळावर एक वर्षाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुलगा अजहरुद्दिन याला पाठवले नंतर सन २०१५ मध्ये न्युझीलंडमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण करून भारतात परत आल्यावर अजहरुद्दिन ने सर्व परिक्षा देऊन उत्तीर्ण झाला आहे अजहरुद्दिनचे कुटूंब हे सर्वसामान्य आहे त्याची बहीण कुमारी उजेमा काझी हि पण सध्या स्पर्धा परिक्षेची तय्यारी करत आहे
काज़ी अज़हरुद्दीन मोइनुद्दीन हा उस्मानाबाद जिल्ह्यातून पहिला पायलट झाला आहे त्याला इंडिगो एयर लाइन मधे पायलट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली आहे काझी याने उस्मानाबाद येथील
विद्यामाता हायस्कूल मधून दहावी पर्यंत शिक्षण घेतले व आकरावी बारावी चे शिक्षण भोसले हाईस्कूल मधून घेतले आहे
पायलट ट्रेनिंग भारत आणि मल्टी इंजिन विमान चलविनायचे प्रशिक्षण न्यूज़ीलैंड मधे झाले आहे अजहरुद्दिन ने मिळवलेल्या यशामुळे अजहरुद्दिनचे व त्याच्या कुटूंबीयांचे सर्व स्थरातून कौतूक केले जात आहे