हिरव्या झेंडयावर बंदी घाला! सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर.


____________

रिपोर्टर...चंद्रकोर आणि त्यावर तारा असलेला हिरवा झेंडा फडकवण्यावर बंदी घालावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एका याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वासीम रिझवी यांनी ही याचिका दाखल केली आहे. चंद्रकोर आणि त्यावर तारा असलेल्या हिरव्या झेंडयाचा इस्लामशी काहीही संबंध नसून हा झेंडा पाकिस्तानातील एका राजकीय पक्षाच्या झेंडयासारखा आहे असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.हा झेंडा अनेक इमारती आणि धार्मिक स्थळांवर लावलेला असतो त्यामुळे जातीय तणाव निर्माण होतो. भारतात फडकवला जाणारा हिरवा झेंडा हा पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाच्या झेंडयासारखा आहे असे वासीम रिझवी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. न्यायमूर्ती एके सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने रिझवी यांच्या वकिलाला याचिकेची एक प्रत अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना पाठवायला सांगितली. तृषार मेहता केंद्र सरकारच्या वतीने उत्तर देतील असे ते म्हणाले.पुढच्या दोन आठवडयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. १९०६ साली स्थापन झालेला मुस्लिम लीग हा पक्ष चंद्रकोर असलेला हिरवा झेंडा वापरायचा. आता भारतीय मुस्लिम इस्लामची ओळख म्हणून हा झेंडा फडकवतात असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. खरंतर इस्लामशी या झेंडयाचा काहीही संबंध नाहीय. पण मुस्लिम बहुसंख्य भागात हा झेंडा फडकवला जातो.