रामवाडी शाळेच्या पुष्कर कोळी चे नवोदयमध्ये यश..

           रिपोर्टर...उस्मानाबाद तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा रामवाडी येथील शाळेचा विद्यार्थी पुष्कर शाम कोळी या विद्यार्थांची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे निवड झाली आहे.                             नवोदय विद्यालयास निवड झाल्याबद्दल पुष्कर कोळी चा  शाळेच्या वतीने श्रीमती बारसकर निलावती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुष्कर कोळीला श्री पुदाले एस आर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे अभिनंदन गावचे सरपंच श्री पांडुरंग वाकुरे, शालेय व्य समितीच्या अध्यक्षा उमा हाजगुडे, मुख्याध्यापक ठक्कुरवार जी बी , शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बिभिषण पाटील, नेताजी फंड, कांबळे बी वाय , शिवाजी मोरे, श्रीमती वाघमारे मॅडम आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत