तुळजापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी 'मूल्यवर्धन' कार्यशाळेचे आयोजन


रिपोर्टर...    शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या समन्वयातून तयार झालेला  'मूल्यवर्धन' हा 'महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम' म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला.
सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात 36 जिल्ह्यातील 215 तालुक्यातील मराठी माध्यमाच्या 37508 शाळांमध्ये शिकणार्या इ.1ली ते 4 थी मधील 2019948 विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम कार्यन्वित करावयाचा असून राज्यातील 105709 शिक्षकांना या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  प्रशिक्षित करण्यासाठी ठिकठिकाणी 'मूल्यवर्धन' कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
       या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील 14 केंद्रांमधून प्रत्येकी 2 शिक्षक व 1 केंद्रप्रमुख अशा एकूण 42 प्रेरकांसाठी  या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद कन्या प्रशाला तुळजापूर येथे दि.16जुलै ते 19 जुलै 2018 पर्यंत करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी अध्यक्ष म्हणून तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सोनवणे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य मा.महेंद्र (काका) धुरगुडे,कार्यक्रमाचे तालुका समन्वयक कंदले सर,जि.शै.व सातत्यपूर्ण विकास संस्था उस्मानाबादचे विषय साधनव्यक्ती महामुनी सर व प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद सर उपस्थित होते.या कार्यशाळेसाठी श्री.विजय धनवे,जे.एस.गरड,खुटे बी.एस.व हणमंत जाधव सर हे मार्गदर्शन  करणार आहेत.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारोहाचे सुत्रसंचालन श्री.शांताराम कुंभार यांनी तर आभार ज्येष्ठ केंद्रप्रमुख सोनवणे साहेब यांनी मानले.