रिपोर्टर भूम.. भारतीय रेल्वे बोर्डाचे सदस्य तथा शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी भूम येथील नाथपंथी, गोसावी, समाजातील लोकांना अन्नधान्यासह चादर वाटप करून त्यांच्यावर होत आसलेले आन्याय थंबवावे व त्यांच्यावर हाल्ला करणाऱ्यांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करावी असे मत व्यक्त केले.
रायनपडा ता. साक्री येथे पोटाच्या खळगी भरण्यासाठी आपली कला दाखवून, भिक्षा मागून आपले व कुटूंबाचे उदरनिर्वाह करणारे नाथपंथी समाजाचे चार युवक भारत भोसले ,दादाराव भोसले, भारत माळवे, राजू भोसले अगणु इंगोले यांना बेदम मारहाण करून जीवे मारल्याने या समाजात भिक्षा मागण्या साठी जाणे अवघड बनले आहेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .यांच्या या अवस्था पाहून शंकर राव बोरकर यांनी भूम शहरातील नाथपंथी, डवरी, गोसावी समाजाला कुटुंब व त्यांची उदरनिर्वाह साठी अन्नधान्य वाटप केले, व सदैव मी आपल्या पाठीशी आहे आवर्जून उल्लेख केला.
या प्रासनंगी भाजपा ता अध्यक्ष आदम शेख, मा जिल्हा उपप्रमुख दिलीप शाळू महाराज, जी .प .सदस्य उद्धव साळवी, युवा सेना प्रमुख प्रभाकर शेंडगे, अजय शेंडगे, वरुड चे सरपंच राहुल कांबळे,किशोर कात्रजकर,युवा नेते प्रल्हाद अडागळे, कोर दगडू मामा,शिवशंकर सोलापूर, नाथपंथी समाजाचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण आदी मोठ्या प्रमाणावर भटकी समाज व महिला उपस्थित होता.