उस्मानाबाद-धनेश्वरी शिक्षणसमूह व शिवार फाऊंडेशन संचलित शिवार संसद युवा चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूल, गडपाटी आळणी येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित आसलेले चला हवा येऊ द्या फेम व प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले की,आज ताण तणावाचे जीवन आहे समस्या सर्वांनाच आहेत मात्र या समस्या सोडविण्याऐवजी आज लोक आत्महत्या करताना दिसून येतात.कुणाला शेतीच्या तर कूणाला शिक्षणाच्या समस्या आहेत तर तरुणांना नोकरी नाही म्हणून तर काहीजण मनासारखी प्रेयसी मिळाली नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. पण आत्महत्या हे पळपुटेपणाचे लक्षण असुन आत्महत्येचा विचार जरी मनात आला तरी आपल्या आत्महत्याचे कसलेही कारण असले तरी त्याचे निराकरण करण्यासाठीच शिवार संसद योजनेच्या शेतकरी हेल्पलाइनची सुरुवात 1 आगस्ट पासून होईल. तसेच त्यांनी त्यांच्या चित्रपट जीवनापुर्वीच्या जीवनातील गमतीजमती सांगत उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडले.
यावेळी धनेश्वरी शिक्षणसमूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी असला तरी लोकांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रतिभा आहे त्याचेच उदाहरण म्हणजे परवाच्या राज्यसेवा परीक्षेत जवळपास ३५ विद्यार्थी उस्मानाबाद जिल्ह्यातील पी.एस.आय. उत्तीर्ण झालेत.तसेच या जिल्ह्यात नैसर्गिक परिस्थिती थोडीसी वेगळी असली तरी आपल्या इथे पडणाऱ्या पाऊसाचे योग्य नियोजन झाले तर नक्कीच भविष्यात उस्मानाबादची दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसुन टाकता येईल.
यावेळी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी शेतकरी हेल्पलाईनचे कौतुक केले तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप,धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य उमाटे,अॅड.योगेश सोन्ने,रामेश्वर पवार,सचिन सोनारीकर,किशोर तिवारी,राजु राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक हेगाणा यांनी तर सुत्रसंचलन प्रा.तुषार वाघमारे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूल व शिवार फाऊंडेशन यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
