महाराष्ट्र लाईव्ह रिपोर्ट
उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हंगामी पिकं घेण्याकडे शेतकर्याचा जास्त कैाल पहायला मिळतो.ही पिक घेत आसताना शेतातील मातीला कोनते खत योग्य आहे मातीची प्रत काय आहे हे शेतकर्याला माहीत नसते.त्यामुळे शेतकरी महागाचे खत बियाने वापरून आर्थिक नुकसानीत जातो. या नुकसानीवर मात करण्यासाठी पंतप्रधान माती परिक्षण योजना कृषी विभागामार्फत चालवली जाते.त्यामध्ये दर तिन महीण्याला माती परिक्षण करणे गरजेचे आहे.परंतू शेतकर्यापर्यत कृषी विभाग न पोहचल्यामुळे शेतकर्याचे नुकसान होत आहे.माती परिक्षणा बाबत शेतकर्यामध्ये जनजागृती होणे गरजेेचे आहे.