डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रम..


उस्मानाबाद...:–धनेश्वरी शिक्षणसमूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हयामध्ये ठिकठिकानी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये १०१ युवकांच्या अवयवदानाचा संकल्प करण्यात येणार आहे. धारासुर मर्दिनी येथे महाभिषेक व हजरत खाजा शमशोद्दिन गाजी रहे दर्गा येथे चादर चढवण्यात येणार आहे.गडपाटी आळणी येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूल व ईट येथे महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे.तसेच जिल्ह्यातील भुम,परंडा,वाशी,कळंब, उस्मानाबाद ,तुळजापूर सह बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात येणार आहे.तसेच येरमाळा येथे सैनिकांच्या मातापित्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.तर कृषी विद्यालय कुंभारी डोंजा,संत मिरा परंडा ,भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब,शांतादेवी पाटील शैक्षणिक संकूल वाशी,डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूल गडपाटी आळणी येथे वृक्षारोपन व गरजुंना शैक्षणिक साहित्य वाटप ही करण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी ६-३० वाजता उस्मानाबादेतील छायादिप मंगलकार्यालयामध्ये डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा मान्यवराच्या हास्ते सत्कार समारंभ आयोजीत केला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित रहावे असे अवहान धनेश्वरी शिक्षणसमुहाच्या वतीने करण्यात आले आहे.