रिपोर्टर : सरपंच हा ग्रामविकासाचा कणा असल्याने विविध योजनांची माहिती घेऊन सरपंचांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावचा विकास साधावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केले़
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या जिल्हा मेळाव्यात पाटील बोलत होते़ यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील(कुर्डूकर), राज्य संघटक कैलास गोरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲड़ विकास जाधव, आदर्श युवा सरपंच कल्पिता पाटील, गट नेते दत्ता साळूंके, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, ज्ञानदेव राजगुरु, मंहमद रफी महेबुब तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा ॲड़ वर्षा जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ़ रविंद्र जगताप, उपाध्यक्ष काका मुंढेकर, श्रीकांत तेरकर, आनंद कुलकर्णी, दत्ता कस्पटे, स्वाती गायकवाड, वर्षाराणी पवार, विशाल पवार, शिल्पा पाटील, संतोष कस्पटे, वर्षा बैरागी, सौ़ दराडे, सौ़ गटखळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना श्री़ पाटील म्हणाले, सरपंच हा गावचा कर्ता असतो, त्यामुळे सरपंचांनी गावच्या विकासाठी आराखडा तयार करुन पायाभुत सुविधासाठी विकास कामात स्वत:चे योगदान द्यावे़ सरपंचांचे मानधन वाढविण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर गावच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषदेकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी यावेळी दिले़
..............
सरपंचांच्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार- जयंती पाटील
गावच्या विविध समस्या सोडविण्यासह दररोज लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या सरपंचाला न्याय मागण्यापासून वंचित रहावे लागत आहे़ सरपंचांना तुटपुंज्य मानधन दिले जात आहे़ सरपंचांनी संघटित होवून सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवावा, असे आवाहन सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डुकर) यांनी केले़