पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे!रिपोर्टर...   केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळल्या. आता ६,७,८ आणि ९ जून हे चारही दिवस तुफानी पावसाचे असतील असा अंदाज IMD या संस्थेने वर्तवला आहे. ५ जून म्हणजेच आजही उत्तर आणि दक्षिण कोकणात चांगला पाऊस होईल असेही आयएमडीने म्हटले आहे. आयएमडीने या संदर्भातले एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण कोकणात कसा पाऊस पडेल त्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे.
आयएमडीने व्यक्त केलेला अंदाज
उत्तर कोकण विभाग
५ जून २०१८
रायगड जिल्ह्यात विजा कडाडून पाऊस पडेल. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे
६ जून २०१८

रायगड जिल्हा आणि इतर परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज

७ जून २०१८
ठाणे आणि मुंबई भागात जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजा चमकण्याचा अंदाज

९ जून २०१८
उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज

 दक्षिण कोकण

५ जून २०१८
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज

६ जून २०१८
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
७ जून २०१८
विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज

८ आणि ९ जूनलाही अशाच प्रकारे पाऊस पडेल असेही आयएमडीने म्हटले आहे.