राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

मुंबई : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजी कर्डिले, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अवर सचिव महेश वाव्हळ यांनीही पुष्प अर्पण करून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले.