कौडगाव येथे उभारणार ५० मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प.....
. रिपोर्टर..  रिपोर्टर... चार वर्षाच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर कौडगाव, येथील प्रस्तावित ५० मेगावॅट क्षमतेच्या सौरउर्जा प्रकल्पाला आखेर हिरवा झेंडा मिळाला. येणार्या सहा महीण्यामध्ये हा प्रकल्प कार्यन्वीत होईल आशी माहीती मीळत आहे.

उस्मानाबाद सारख्या मागासलेल्या भागात या प्रकल्पामुळे कांही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल परंतु अर्थकारणाला चालना मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असून निती आयोगाने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी निवडलेल्या जिल्ह्यामध्ये आता याचा समावेश केला आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास नसल्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण शेती केंद्रीत असून भौगोलिकदृष्टया जिल्हा दुष्काळप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प आणण्याच्या अनुषंगाने एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचे ठरवून उस्मानाबाद शहरालगत कौडगांव येथे २५०० एकर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्याचा निर्णय आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उद्योग राज्यमंत्री असताना घेतला होता. सध्या १५०० एकर जमीन कौडगाव एम.आय.डी.सी. कडे उपलब्ध असून उर्वरित १००० एकरच्या भूसंपादनाचे काम अंतीम टप्प्यात आहे.

या औद्योगिक क्षेत्रात महाजनकोला सौर उर्जा प्रकल्प उभारणी करण्यासाठी आ. पाटील यांनी सन २०१२ मध्ये जमीन घेण्यास भाग पडून तेथे ५० M.W. चा सौरऊर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प महाजनकोच्या माध्यमातून सन २०१४ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाची निविदा याआधी दोन वेळा काढून रद्द करण्यात आली होती. त्यानंतर १३ डिसेंबर २०१६ रोजी निविदा अर्जाची विक्री सुरु केली होती परंतु प्रक्रिया प्रलंबित राहिल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून आ. पाटील यांचा  पाठपुरावा चालू होता. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे तरी याची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी हि मागणी कायम ठेऊन हा प्रकल्प लवकर सुरु कराव यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेकदा विधिमंडळात देखील आवाज उठविला आहे. उर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब दि. २८/०६/२०१७ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौयावर असताना त्यांना याबद्दल निवेदन ही देण्यात आले होते. त्यानंतर महाजनकोने या प्रकल्पासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०१७ निश्चित केलेली होती. १० वर्षाची  ऑपरेशन (सेवा) व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील कंत्राटदाराला देण्यात येणार  असून  प्रकल्प  ६  महिन्यात कार्यान्वयित होईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. महावितरणला म्हनावा असा दर  मिळत नव्हता, त्यानुसार आलेल्या निविदेमध्ये L&T, BHEL सह इतर कंपन्यामध्ये प्रति युनिट रेटचे निगोशियेषण झाले व शेवटी BHEL ला या प्रकल्पाची ऑर्डर देण्याचे अंतिम झाल्याचे समजते. त्यानुसार ते रु.३.०५ प्रति युनिट ने महावितरणला वीज विकणार आहेत. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला व पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

सदर ५० मेगावॅटचा प्रकल्प हा २०० एकरवरच उभारला जाणार असल्यामुळे कंपनीच्या उर्वरित जागेत  आणखीन एक ५० मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याबाबत आ. पाटील आग्रही आहेत. तसेच कौडगाव औद्योगिक क्षेत्रातील एम.आय.डी.सी. च्या उर्वरित जागेवर आणखीन उद्योग आणण्यासाठी आ. पाटील प्रयत्नशील राहणार आहेत. उस्मानाबाद जिल्हा हा पर्जन्य छायेतील जिल्हा असल्यामुळे येथे पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित आहे. त्यामुळे येथे औद्योगिकरणासाठी कमी दराने जमीनी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील वातावरण सौरऊर्जेसाठी पोषक असून येथे चांगले रेडिएशन मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील होर्टी, अणदूर, केशेगांव येथील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु आहे. त्यामुळे येथे सौजऊर्जा प्रकल्पासह सौरऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प तसेच लातूर येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे कोच बनविण्याच्या कारखान्यासाठी अनुषंगीक उपकरण निर्मिती प्रकल्प व पुरक उद्योग सुरु केल्यास जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळू शकतो अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली.