उस्मानाबाद- धनेश्वरी शिक्षणसमूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा वाढदिवस जोरदार साजरा झाला.यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की,उस्मानाबाद जिल्हा हा देशात शेवटून चौथा आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर युवकांनी मनावर घेतले पाहिजे तरच आपला जिल्हा भविष्यात प्रगतीपथावर जाईल.आज माझा वाढदिवस पूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा केला विविध ठिकाणी फळवाटप,रक्तदान शिबीरे आयोजित केली.त्याबद्दल मी माझ्यावर प्रेम करण्या-यांचे आभार मानतो.तसेच मी भविष्यकाळात कोणत्या पक्षाची निवड करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे मात्र मी एकच सांगतो.माझा कोणताही असो माझ काम मात्र भविष्यात सामान्य माणसाला केंद्रबिंदु मानूनच अखंड राहिल अशी ग्वाही देतो असे म्हणाले.अध्यक्षीय भाषणात नानासाहेब पाटील हे म्हणाले की डॉ.प्रतापसिंह पाटील हे साधे राहणीमान व उच्च विचारसणी प्रमाणे वागणारे व्यक्तीमत्व आहे.व त्यांच्या बोलण्यात व वागाण्यात नम्रपणा आहे.
यावेळी हालगी व फटाक्याची प्रचंड आतषबाजी व तरुणांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर बहरुन गेला होता.या अभिष्टचिंतन सोहळ्यास उस्मानाबादचे मा.नगराध्यक्ष नानासाहेब पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे,धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे,धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,उस्मानाबादचे नगरसेवक सोमनाथ गुरव,नगरसेवक राहुल काकडे,नगरसेवक अक्षय ढोबळे,भाजपा मिडीया सेलचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,कळंब भाजपा तालूकाध्यक्ष दिलीप पाटील,धनंजय शिंगाडे,युवासेना जिल्हा सचिव विकी चव्हाण,कळंब युवासेना तालुकाप्रमुख सागर बाराते,तुळजापुर युवासेनाप्रमुख प्रतिक रोचकरी,उपतालुकाप्रमुख भारत सांगळे,बार्शी रासपा तालुकाध्यक्ष दत्ता देवकर,पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे,बार्शी येथील छत्रपती ग्रूपचे अध्यक्ष अजय पाटील,ईटचे अविनाश चव्हाण यांच्यासह पूर्ण जिल्ह्यातून अनेक सरपंच,उपसरपंच,विविध पक्षाचे पदाधिका-यासह सामाजिक,
शैक्षणिक,राजकिय,क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते.यावेळी प्रा.विशाल गरड,चेअरमन अभिजीत पाटील,परमेश्वर पालकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक उंबरे सर,दशरथ सावंत महाराज,शांतीगिरी महाराज यांच्यासह अनेकांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक जाधव यांनी तर प्रास्ताविक प्रा.सतिश मातने यांनी केले.